About this app
गहू लागवड गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे भारतातील गव्हाखालील एकूण क्षेत्रापैकी सु. ३० टक्के क्षेत्र बागायती असून ते मुख्यत्वे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत आहे. गहू हे भारतातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. जगातील गहू पिकाचे एकूण क्षेत्र व उत्पादनामध्ये भारत जगात दुसर्या स्थानावर आहे गहू या पिकाबद्दल माहिती घेण्या अगोदर गहू हे पिक आपण घ्यावे कि नाही? या प्रश्नाचे उत्तर शेतकरी बांधवांनी जाणून घ्यायला हवे. घ्यायचा असेल तर किती क्षेत्र या पिकास द्यावे? व उत्पादनाचे काय लक्ष्य ठेवावे? हे मुद्दे देखील अतिशय महत्वाचे आहेत. कोणकोणती पिके घेतली जावू शकतात? इतर कोणते पिक आपण घेवून आपण चांगला नफा कमवू शकतो का? आपल्याकडे एकूण किती क्षेत्र आहे? मृदेची अवस्था काय? कोणत्या पिकासाठी बाजारपेठ अनुकूल आहे? कोणत्या पिकापासून किती उत्पादन येईल? शाश्वत उत्पन्न किती? पाणी साठा किती? सर्वसाधारण वातावरणाचा कल कसा असणार आहे? मनुष्यबळ किती उपलब्ध आहे? यापूर्वीचा आपला काय अनुभव आहे? गहू पिक घ्यायचे असेल तर कोणते वाण निवडावे? गहू कोणत्या ग्राहकासाठी घ्यायचा? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक शेतकरी बांधवासाठी वेगवेगळी असतील. असा चौफेर विचार करून निर्णय घ्यावा.
गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे
हलक्या ते मध्यम जमिनीत गव्हाची लागवड.
गहू पिकासाठी पाण्याची करतरता.
पाण्याची उपलब्धता असल्यास इतर पिके घेण्याचा कल.
शिफारस केलेल्या वाणाची लागवड न करणे.
गहू पीक वाढीच्या सुरवातीच्या दाणे भरण्याच्या व पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त तापमान.
हवामानातील वेळोवेळी होणारे बदल.
शिफारशीपेक्षा कमी खताचा वापर.
कोड व रोगांचा प्रादुर्भाव.
१५ डिसेंबरनंतर गव्हाची पेरणी.
नवीन प्रसारित वाणांचे योग्य प्रतीच्या बियाण्याची उपलब्धता न होणे.
जमीन
गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन अत्यंत आवश्यक असते.
हवामान
गहू पिकासाठी थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्यावेळी २५ अंश सें.ग्रे. इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
पूर्वमशागत
गव्हाच्या मुळ्या ६० सें.मी. ते १.00 मीटर खोलीपर्यंत वाढत असल्याने गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी खरिप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने १५ ते २० सेमी खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
पेरणीची वेळ
बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी व उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ किंवटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.
जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरावड्यात करावी.
बियाणे आणि बीजप्रक्रिया
गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी २0 ते २२ लाख झाडे शेतात असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रती हेक्टरी १oo किलो बियाणे वेळेवर पेरणीसाठी वापरावे.
उशिरा पेरणीसाठी कमी तापमानामुळे गव्हाच्या पिकास कमी फुटवे येत असल्यामुळे बियाण्याचे प्रमाण १२५ ते १५० किलो प्रती हेक्टरी एवढे ठेवावे. जिरायत पेरणीसाठी ७५ ते १00 किलो प्रती हेक्टरी बियाण्याचा वापर करावा.
पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रती १० किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन यांची प्रती २५0 ग्रॅम या प्रमाणे बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
पेरणी
गव्हाच्या वेळेवर आणि जिरायत पेरणीसाठी दोन ओळीत २0 सें.मी. तर उशिरा पेरणीसाठी १८ सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. तसेच पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. गव्हाची पेरणी उभी आडवी न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे
२० सें.मी. खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४
सोईचे होते. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर करावी.
App Permissions
Required to be able to access the camera device.
Allows an application to write to external storage.
Allows an application to read from external storage.
Allows applications to open network sockets.
Allows applications to access information about networks.